संपूर्ण स्वास्थ्य
‘संपूर्ण’ म्हणजे पूर्ण किंवा परिपूर्ण. ‘स्वास्थ्य’ या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ आरोग्य असा घेतला जातो, पण त्याचा खरा आणि खोल अर्थ म्हणजे ‘स्वतःमध्ये स्थिर असणं’.
हे दोन्ही शब्द मिळून ‘संपूर्ण स्वास्थ्य’ ही संकल्पना बनते, जी डॉ. सारंग पाटील यांच्या कामाचा मुख्य गाभा आहे. आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणं एवढंच नाही; तर शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आतल्या पातळीवर अधिक निरोगी, संतुलित आणि स्वतःमध्ये स्थिर होत जाणं ही ती एक प्रक्रिया आहे.
याचा अर्थ आजाराकडे दुर्लक्ष करणं असा अजिबात होत नाही. तसंच आधुनिक वैद्यकीय उपचारांऐवजी जुन्या पारंपरिक पद्धती वापरणं, किंवा आरोग्याचा प्रत्येक प्रश्न फक्त जीवनशैलीतूनच सुटू शकतो असं समजणं, असाही याचा अर्थ नाही.
उलट, संपूर्ण स्वास्थ्य हा आरोग्याकडे पाहणारा एक होलिस्टिक, सर्वांगीण दृष्टिकोन आहे. रोगाच्या निदानापलीकडे जाऊन त्या व्यक्तीकडे पाहणं, मनाचा विचार करतानाच शरीराला समजून घेणं, आणि आवश्यक वैद्यकीय उपचारांसोबतच आहार, व्यायाम, श्वसन, झोप, नातेसंबंध, जीवनाचा अर्थ आणि आंतरिक शांतता यांचं महत्त्व ओळखणं, ही याची दिशा आहे.
दीर्घकालीन आरोग्याचा सर्वांगीण मार्ग
संपूर्ण स्वास्थ्य हे प्राचीन भारतीय उपचार परंपरा आणि आधुनिक जीवनशैलीच्या समन्वयातून व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्याला नवसंजीवनी देणारे विज्ञान आहे. शरीर, ऊर्जा आणि मन या सर्व पातळ्यांवर मूळ कारणांवर काम केल्यास नैसर्गिक संतुलन आणि निरोगी जीवन सहज साध्य होते.
तुमच्या रिपोर्ट्सनुसार वैयक्तिक आरोग्य योजना हवी आहे का?
हे सोपे नैसर्गिक उपाय रोजच्या जगण्यात खूप फायदेशीर ठरतात. तुमच्या तपासण्या आणि प्रकृतीनुसार सविस्तर आहार व योग्य दिनचर्या आखण्यासाठी डॉ. पाटील यांच्याशी थेट चर्चा करा. चालू असलेली औषधे नियमित सुरू ठेवा; तुमचे आरोग्य सुधारेल तसतसे पुढील योग्य बदल तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली ठरवले जातील.
